Posts

पालघर जिल्ह्यातील अल्पपरिचीत गडकिल्ले

Image
1.आशेरी गड  ( Aasheri Fort )   किल्ल्याची ऊंची :  1680 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात 'दादा' वाटावा असा हा अशेरीगड किल्ला आहे. याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. आशेरीगड इतिहास : आशेरीगड  हा शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणत: ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली. पेशव्यांनी १७३७ च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला. १८१८ नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला. पाहण्याची ठिकाणे : आशेरी गडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा घरा भोवती साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणार्‍या वार्‍याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे....